महिनाभरात पाणीपुरवठ्यात ५० एमएलडीने होणार वाढ २५०० मिमी जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आणण्यात मनपाला यश

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहराला सध्या मिळणाऱ्या पाण्यात पुढील महिनाभरात सुमारे ५० एमएलडीची वाढ होणार असून त्यामुळे पाणीपुरवठ्यातील तूट मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास शुक्रवारी (दि.१७) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची चाचणी १४ एप्रिल रोजी यशस्वीरीत्या पार व पडली. सुमारे २५०० मिलीमीटर व्यासाच्या जायकवाडी जलवाहिनीद्वारे धरणातून नक्षत्रवाडीपर्यंत नाथसागराचे पाणी आणण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाला यश आले आहे.
शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची चाचणी १४ एप्रिल रोजी यशस्वीरीत्या पार पडली. सुमारे २५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे जायकवाडी धरणातून नक्षत्रवाडीपर्यंत नाथसागराचे पाणी आणण्यात एमजेपी व मनपा प्रशासनाला यश आले. सुमारे ३८ किलोमीटरचा प्रवास करत हे पाणी नक्षत्रवाडी
पाणी टंचाई होणार कमी
44 सध्या जाणवणारी पाणीटंचाई कमी होऊन पुखठा अधिक नियमित होईल, तसेच १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचा गॅप भरून काढण्यात येईल. जुन्या जमीन पातळीवरील जलकुंभात घेऊन पाण्याचा गॅप कमी केला जाईल. महिनाभरात शहरात पाणी आणणे हे प्रमुख उद्दिष्ट राहणार असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले.
येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचले. यावेळी आयुक्त अमोल येडगे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे उपस्थित होत्या.
नक्षत्रवाडीपर्यंत पाणी पोहोचल्यानंतर पुढील टप्प्याबाबत माहिती देताना आयुक्त येडगे यांनी सांगितले की, जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी काही आवश्यक कामे अद्याप बाकी आहेत. तसेच
वितरण वाहिन्यांमधील तूट भरून काढणे, यासह ड्रेन लाईनचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. या ड्रेन लाईनसाठी सुमारे २१ दिवसांचा कालावधी लागणार असून या कालावधीत इतर पूरक कामे पूर्ण करण्याच्या सूचना एमजीपीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर शहराला मिळणाऱ्या पाण्यात किमान ५० एमएलडीने वाढ होईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions